Chakan Crime : गळा आवळून अल्पवयीन तरुणीचा खून

एमपीसी न्यूज : चाकण जवळील (Chakan Crime) नाणेकरवाडी (ता. खेड ) येथे एका सतरा वर्षीय अल्पवयीन तरुणीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि.26) दुपारी हि घटना घडली असल्याचे चाकण पोलिसांकडून सांगण्यात आले.

Pimpri Crime : खोटे बोलण्यास नकार दिल्याने भर रस्त्यात 19 वर्षीय मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रीती कुमारी संतोष साह ( वय 17 वर्ष, सध्या रा. नाणेकरवाडी, चाकण, ता. खेड, मूळ रा. फतेपूर बिहार) असे खून झालेल्या अल्पवयीन तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकास ताब्यात घेतले आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार प्रीती कुमारी हि रविवारी दुपारी एकटीच घरी असताना एक तरुण घरात शिरला. त्यानंतर त्याने घराचे दार लावून घेतले. त्यानंतर त्याने या तरुणीचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत पोलिसांनी संबंधित (Chakan Crime)तरुणाला ताब्यात घेतल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी भेट दिली. चाकण पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. संबधित तरुणीवर खूनापूर्वी अत्याचार झाले होते का? या बाबत शवविच्छेदन व उत्तरीय तपासणीनंतर स्पष्टता येणार आहे.  दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित आरोपी खून झालेल्या तरुणीच्या बिहार येथील गावातीलच असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.