Chakan crime News : साडेबारा किलो अफूच्या बोंडांसह 22 लाख 87 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – अफुच्या बोंडांच्या तस्करीचा प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने सापळा रचून एक ट्रक पकडला. त्यात दोन लाख 23 हजार 200 रुपये किमतीच्या अफुच्या बोंडांसह एकूण 22 लाख 87 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई म्हाळुंगे पोलीस चाैकीच्या हद्दीत शनिवारी (दि. 30) करण्यात आली.

जगदीशप्रसाद पुनमाराम बिष्णोई (वय 32, रा. जोधपूर, राजस्थान), तानाजी बालाजी सातपुते (वय 23), अभिनेश चाईन्सिंघ पाैळ (वय 47, दोघेही रा. चिंबळी फाटा, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथून अफुची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर) एका ट्रकमध्ये घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावर कुरुळी येथे सापळा लावला.

चाकणकडून भोसरीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला थांबवून ट्रकचालक आरोपी बिष्णोई याच्याकडे पोलिसांनी चाैकशी करून ट्रकची पाहणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये अफुची बोंडे मिळून आली. त्याचबराेबर चिंबळी फाटा येथील हाॅटेल आराध्या व्हेज नाॅनव्हेज व हाॅटेल पंजाबी ढाबा येथेही पोलिसांनी छापा मारून अफुची बोंडे जप्त केली.

या कारवाईत 42 हजार 40 रुपयांची रोकड, 5 हजार 520 रुपयांचा गुटखा, दोन लाख 23 हजार 200 रुपये किमतीची 12 किलो 400 ग्रॅम अफूची बोंडे (दोडा चुरा भुकटी व कणीदार पावडर), 20 लाख रुपये किमतीचा ट्रक तसेच 15 हजारांचे तीन मोबाईल फोन, असा एकूण 22 लाख 87 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक निरीक्षक नीलेश वाघमारे, उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी संतोष असवले, अनंत यादव, संदीप गवारी, सुनील शिरसाठ, नितीन लोंढे, महेश बारकुले, दीपक साबळे, भगवंता मुठे, अमोल शिंदे, मारुती करचुंडे, विष्णू भारती, गणेश कारोटे, अनिल महाजन, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, मारोतराव जाधव, राजेश कोकाटे, योगेश तिडके, योगिनी कचरे, सोनाली माने यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.