Chakan Crime News : चाकणमधून एक कार व एक दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन वाहने चोरून नेली. त्यामध्ये एक दुचाकी आणि एक कार आहे. याबाबत सोमवारी (दि. 7) चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत नितीन संपतराव सरनकर (वय 35, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. सरनकर यांनी त्यांची आठ हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो दुचाकी (एम एच 14 / एफ एफ 5951) 18 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता चाकण मधील गंधर्व हॉटेल समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली.

दुस-या घटनेत सोपान गंगाराम नाईकरे (वय 66, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. नाईकरे यांनी त्यांची महिंद्रा कंपनीची बोलेरो कार (एम एच 14 / बी सी 0771) सोमवारी (दि. 7) पहाटे दीड वाजता पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे पार्क केली होती. पहाटे दीड ते साडेपाच वाजताच्या कालवधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.