Chakan Crime News : पैसे मागितले म्हणून ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ व मारहाण

एमपीसी न्यूज –  पैसे घेण्यासाठी आले म्हणून 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करत मारहाण कऱण्यात आली आहे. ही घटना 28 जानेवारी रोजी आंबेठाण (Chakan Crime News) येथे घडली.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात धर्मा गंगाराम ठोंबरे (वय 60 रा. आंबेठाण) यांनी सोमवारी (दि.30) फिर्याद दिली असून नागेश गोपीनाथ शिंदे (वय 37 रा.आंबेठाण) याच्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pune Crime News : घरफोडी व जबरी चोऱ्या करणाऱ्या आरोपीला बेड्य़ा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या भाऊ सोपान ठोंबरे याच्यासह आरोपीकडे त्यांचे पैसे घेण्यासाठी गेले. यावेळी आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करत काठीने, दगडाने व हाताने मारहाण केली.यामध्ये फिर्यादी जखमी झाले असून पोलीस पुढील तपास करत (Chakan Crime News) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.