Chakan Crime News : रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज – रस्त्यावर उभी केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.22) खालुंब्रे गावाच्या जवळ सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

सुभाष महादेव लाकवडे, असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी त्यांचा मित्र ज्ञानेश्वर दत्तात्रय पवार (वय 51, रा. जुनी सांगवी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रॅक्टर चालक अशोक महादेव रणदिवे (वय 26, रा. म्हाळुंगे, खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुभाष लाकवडे हे आपली दुचाकीवरुन (एम एच 14 बीयु 3251 ) सुदुंबरे येथून जुनी सांगवी येथे येत होते. खालुंब्रेपासून 100 मीटर अंतरावर असलेल्या हुन्डाई चौकातट्रॅक्टर व ट्रॉली (एम एच 11 यु 4818 ) उभी होती. या ट्रॉलीला दुचाकीस्वार सुभाष लाकवडे यांची धडक बसली. त्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.