-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chakan Crime News : अपघात टाळण्यासाठी वळवलेल्या ट्रकची गटारात पलटी

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – अचानक समोर आलेल्या डंपरला चुकवून अपघात टाळण्यासाठी वळवलेल्या ट्रकची गटारात पलटी झाली. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर चालक किरकोळ जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि. 16) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास भांबोली पडवळ वस्ती येथे घडला.

जगन्नाथ विठ्ठल वागबिजे (वय 31, रा. करंजविहीरे, ता. खेड) असे जखमी ट्रकचालकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 17) फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर चालक तुकाराम शंकर पालमपल्ले (वय 38, रा. चिंबळी फाटा, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ट्रक चालक त्यांचा ट्रक (एम एच 14 / एच यु 9365) घेऊन भांबोली पडवळ वस्ती येथे करंजविहीरे ते भांबोली या रोडने जात होते. दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास भांबोली पडवळ वस्ती येथे आरोपी डंपर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात अचानक डाव्या बाजूने डंपर (एम एच 14 / जी डी 8760) चालवत आणला.

ट्रक आणि डंपरची धडक होणार अशी परिस्थिती असल्याने फिर्यादी यांनी त्यांचा ट्रक उजव्या बाजूला वळवला. मात्र ट्रक उजव्या बाजूला रोडच्या बाजूला असलेल्या गटारीत पलटी झाला. यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ट्रकचालक फिर्यादी यांना मुक्का मार लागला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.