Chakan Crime News : एकोणीस किलो गांजा जवळ बाळगणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – आर्थिक फायद्यासाठी एकोणीस किलो गांजा राहत्या घरात साठवून ठेवणाऱ्या तरुणाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपळगाव, चाकण याठिकाणी गुरूवारी (दि.4) हि कारवाई करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

अक्षय विकास शेळके (वय 24, रा. पिंपळगाव तर्फे, चाकण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजाराम महादेव लोणकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी अक्षय याने आपल्या राहत्या घरात तीन लाख 08 हजार 640 रूपये किंमतीचा 19 किलो 290 ग्रॅम वजनाचा गांजा आर्थिक फायद्यासाठी साठवून ठेवला होता. त्याच्याजवळून मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एमडीपीएस अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जोंधळे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1