Chakan Crime News : रम्मी जुगार खेळणाऱ्या 15 जणांवर कारवाई; 11 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – सामाजिक सुरक्षा विभागाने खेड तालुक्यातील मोई येथे सुरू असलेल्या एका रम्मी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 11 लाख 76 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 11) करण्यात आली.

मसूद मकबल शेख (वय 50, रा. मोरे पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) आणि अन्य 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मोई येथे एका शेतामध्ये बांधलेल्या खोलीच्या समोरील मोकळ्या जागेत काहीजण जुगार खेळत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा टाकून कारवाई केली.

या कारवाईमध्ये 78 हजार 630 रुपये रोख रक्कम, एक लाख 52 हजार 500 रुपये किमतीचे मोबाईल फोन, नऊ लाख 45 हजारांच्या नऊ दुचाकी, एक चारचाकी वाहन आणि 320 रुपयांचे रम्मी जुगाराचे पत्ते, असा एकूण 11 लाख 76 हजार 450 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, प्रणिल चौगले, पोलीस अंगलदार सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, शशीकांत पवार, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, अनिल महाजन, गणेश कारोट, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, राजेश कोकाटे, सोनाली माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.