Chakan Crime News : कुरुळी गावात एका टपरीवर कारवाई; 8 हजारांचा गुटखा जप्त

0
एमपीसी न्यूज – खेड तालुक्यातील कुरुळी गावात चाकण पोलिसांनी एका टपरीवर कारवाई केली. त्यात शासनाने प्रतिबंधित केलेला 8 हजार 71 हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. 9) दुपारी साडेपाच वाजता करण्यात आली.
किशोर दस्तगीर धानवल (वय 32, रा. मुऱ्हे वस्ती, कुरुळी) असे अटक केलेल्या टपरी चालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सुनील नागरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुळी गावातील मुऱ्हे वस्ती येथे आरोपी किशोर यांची सरकार पान टपरी आहे. त्या टपरीमध्ये किशोर याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला होता. याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्याच्या टपरीवर छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 8 हजार 71 रुपयांचा पान मसाला, तंबाखू व जर्दा असा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.