Chakan Crime News : ठाणे अंमलदार कक्षात पोलिसांची शूटिंग करत अरेरावी; एकाला अटक

एमपीसी न्यूज – पोलीस चौकीतील ठाणे अंमलदार कक्षात जाऊन शासकीय कामाची गोपनीयता भंग करण्याच्या उद्देशाने मोबाईल फोनमध्ये शूटिंग केली. तसेच पोलिसांशी अरेरावी करून झटापट केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 13) रात्री म्हाळुंगे पोलीस चौकीत घडला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

रामदास मच्छिंद्र हानपुडे (वय 35, रा. सुभाषवाडी, निघोजे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक प्रशांत ठोंबरे यांनी म्हाळुंगे चौकीत फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामदास मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता म्हाळुंगे पोलीस चौकीतील ठाणे अंमलदार कक्षात आला. त्याने शासकीय कामाची गोपनीयता भंग करण्याच्या उद्देशाने त्याच्या मोबाईल फोनमध्ये व्हिडीओ शूटिंग केले. तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत अस्थापना चालू असल्याचे खोटी माहिती दिली.

त्याबाबत फिर्यादी यांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपीने पोलिसांशी अरेरावी केली. शूटिंग केलेला मोबाईल फोन मागितला असता त्याने ‘तुला काय करायचे ते करून घे. मी मोबाईल देत नाही’ असे म्हणत आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत झटापट केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.