Chakan Crime News : राजकीय मतभेदातून मारहाण ; नऊ जणांना अटक

एमपीसी न्यूज – राजकीय मतभेद आणि वाढदिवसाला झालेल्या शाब्दिक बाचाबाचीच्या कारणावरून झालेल्या मारहाणीत चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर, त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 31) रात्री दहाच्या सुमारास सायघवस्ती बोरदरा, खेड याठिकाणी हि घटना घडली.

याप्रकरणी नवनाथ बबन पडवळ (वय 35, रा. बोरदरा, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निखील सुरेश पडवळ, मंगेश बाळासाहेब पडवळ, दत्त सुरेश पडवळ, महेश बाळु पडवळ, अजित फक्कड पडवळ, रविंद्र नथु पडवळ, विशाल नथु पडवळ, तुषार कान्हु पडवळ, अक्षय संतोष आरगाडे या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय बबलु मच्छिंद्र पडवळ, अनिल लक्ष्मण पडवळ, निखील लक्ष्मण पडवळ, फक्कड राजाराम पडवळ, मच्छिंद्र राजाराम पडवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गर्दी जमवत फिर्यादी नवनाथ यांचा भाऊ किरण पडवळ याच्याशी असलेल्या राजकिय मतभेद आणि एका वाढदिवासाच्या कार्यक्रमात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीच्या कारणावरून नवनाथ यांच्या चारचाकीच्या त्यांची चारचाकी आडवी लावली.

आरोपींनी हातातील लोखंडी रॉड व दगडाने नवनाथ यांच्या गाडीचे नुकसान केले. तसेच फिर्यादी यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या इतर तिघांना लाथाबुक्यांनी माराहाण करून दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गोसावी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.