Chakan Crime News : पार्किंगवरुन कुऱ्हाड, लोखंडी गजाने मारहाण; दहा जणांवर गुन्हा, सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – घरासमोर हॉटेलच्या गिऱ्हाईकांना वाहनं पार्क करू न दिल्याने एकाच घरातील चौघांना कुऱ्हाड, लोखंडी गजाने मारहाण केली. गुरुवारी (27) संतोष नगर, वाकी, ता. खेड याठिकाणी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून, सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अमोल भगवान कड, निलेष भगवान कड, संदिप गोरक्ष कड, सौरभ संजय कड, संजय बाबुराम कड, भगवान बाबुराव कड असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, राजेंद्र गोरक्ष कड, मनिषा संजय कड, मंगल संदिप कड, गायत्री अमोल कड (सर्व रा. वाकी बु, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दीपक गुलाब कड (वय 27, रा. वाकी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या गिऱ्हाईकांना वाहनं पार्क करून न दिल्याने आरोपींनी फिर्यादीसह त्यांचे आई-वडील व भावाला कुऱ्हाड, लोखंडी गजाने मारहाण केली. मारहाणीत फिर्यादी यांच्या खांद्याला तर, आई-वडील व भाऊ यांच्या हात व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.