Chakan Crime News : सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीस मारहाण; 12 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – गावातील सार्वजनिक बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीला गावातील 12 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता खेड तालुक्यातील शिंदे गावात घडली.

सुशीला ज्ञानेश्वर झिंजुरके, शंकर ज्ञानेश्वर झिंजुरके, अमोल ज्ञानेश्वर झिंजुरके, सोमनाथ तुकाराम झिंजुरके, विकास तुकाराम झिंजुरके, सुनील रोहिदास झिंजुरके, प्रवीण झिंजुरके, हर्षदा अमोल झिंजुरके, सारिका शंकर झिंजुरके, बाळूबाई तुकाराम झिंजुरके, गौरी सोमनाथ झिंजुरके, नीलम प्रवीण झिंजुरके (सर्व रा. शिंदे वासुली, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अर्चना भानुदास माताळे (वय 38, रा. शिंदे वासुली, ता. खेड) यांनी शुक्रवारी (दि. 16) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गावातील सार्वजनिक बोअरवेलवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी सुशीला हिने फिर्यादी यांना ‘तू आमच्या बोअरवेलवर पाणी भरायला यायचे नाही’ असे म्हटले.

‘सार्वजनिक बोअरवेलवर कोणीही पाणी भरायला येईल’ असे फिर्यादी यांनी आरोपी सुशीला हिला सुनावले. त्यावरून सुशीला हिने अन्य आरोपींना बोलावून बेकायदेशीर जमाव जमवला.

आरोपी शंकर याने फिर्यादी यांच्या मानेवर लाकडाने मारहाण केली. तसेच अन्य आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये फिर्यादी यांच्या पतीचा दात पडला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.