Chakan crime News : टॉवरच्या बीटीएस बॉक्सचे लॉक तोडून दोन लाखांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज – टॉवरच्या बीटीएस बॉक्सचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाखांचे बीटीएस रुस कार्ड चोरून नेले. ही घटना 17 नोव्हेंबर रोजी चाकण एमआयडीसी दोन येथील भांबोली गावात उघडकीस आली.

संजय चंद्रभूषण पाठक (वय 42, रा. दिघी) यांनी याबाबत गुरुवारी (दि. २६) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण एमआयडीसी दोन मधील भांबोली गावात असलेल्या टॉवरमधून 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 50 हजार रुपये किमतीचे चार बीटीएस रुस कार्ड चोरून नेले. एकूण दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता हा प्रकार उघडकीस आला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.