_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Chakan Crime News : बसचा दुचाकीला धक्का; दुचाकीवरील दोघांचे पाय मोडले

एमपीसी न्यूज – बसचा मागून येणाऱ्या दुचाकीला धक्का लागला. त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांचे डावे पाय मोडले. हा अपघात 7 मे रोजी दुपारी भांबोली येथे होरीबा प्रा ली कंपनीच्या समोर घडला.

नितीन ज्ञानेश्वर कोल्हे (वय 41, रा. आगरवाडी रोड, चाकण), बाळासाहेब पोपट धाडगे (रा. खराबवाडी, चाकण) अशी जखमींची नावे आहेत. याबाबत नितीन कोल्हे यांनी सोमवारी (दि. 10) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एच 43 / एच 3237 या क्रमांकाच्या बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र बाळासाहेब धाडगे 7 मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून (एम एच 17 / ए एम 6184) करंजविहिरे येथून चाकणकडे जात होते. भांबोली गावाच्या हद्दीत होरीबा प्रा ली कंपनीच्या समोर एका खासगी बसने त्यांना क्लीनर बाजूने धक्का दिला.

त्यामुळे फिर्यादी आणि त्यांचा मित्र रस्त्याच्या बाजूला खाली पडले. त्यात दोघांचे डावे पाय मोडले. याबाबत बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.