Chakan Crime News : ग्रामसभेत झालेल्या वादातून परस्पर विरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ग्रामसभेत झालेल्या वादातून परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौजे कोयाळी, चाकण येथे गुरुवारी (दि. 21) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत नवनाथ अल्हाट (वय 36, रा.मौजे कोयाळी, चाकण) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून बाळकृष्ण कोळेकर, आकाश बाळकृष्ण कोळेकर, अक्षय बाळकृष्ण कोळेकर, अप्पा लहानु दिघे, गोवर्धन गंगाराम टेंगले, गंगाराम देवराव टेगले यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ग्रामसभेत सरपंच आणि उपसरपंच यांच्या सोबत मागील सभेतील विषयावर चर्चा करत होते. त्यानंतर ग्रामसभेत गोंधळ झाल्याने सभा तहकूब झाली, आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून, दुकानाची नासाधुस केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच, गणेश दत्तात्रय कोळेकर (वय 26, रा. रा.मौजे कोयाळी, चाकण) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून भानुदास अल्हाट, भरत अल्हाट, राजाराम विठ्ठल अल्हाट, बापु बाळासाहेब सरोदे, देवदास अंकुश गायकवाड, महादेव सर्जेराव कोळेकर, शरद हरिभाऊ अल्हाट यांच्या विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामसभा सुरू असताना आरोपींनी मोठमोठ्याने आरडाओरडा करून गोंधळ घातला. ‌सभा तहकूब झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.