Chakan Crime News : गुटखा वाहतूक आणि मटका प्रकरणात चाकण पोलिसांची कारवाई

दोन्ही कारवायांमध्ये 9 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करून 6 लाख 33 हजार 880 रुपयांचा तर मटका अड्ड्यावर छापा मारून 3 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई चाकण पोलिसांनी बुधवारी (दि. 2) केली. यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना माहिती मिळाली की, तळेगाव चौकात शिकापुर चाकण रोडवरून प्रतिबंधित गुटखा वाहून नेला जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी वाहन तपासणी सुरू केली. शिक्रापूर बाजूकडून एक पिकअप गाडी (एम एच 14 / जे एल 1468) आली.

पोलिसांनी तपासणी केली असता त्यात विमल पान मसाला व व्हि-9 कंपनीची तंबाखु असा 33 हजार 880 रूपयांचा गुटखा आढळला. पोलिसांनी गुटखा आणि सहा लाख रुपयांचे वाहन असा एकूण 6 लाख 33 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याबाबत प्रकाश गोविंदजी नगदा (वय 48, रा. रोहकल रोड, ग्रिन ईस्टेट चाकण ता. खेड जि. पुणे) याच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईमध्ये आळंदी फाटा येथे मारुती सुझुकी इको गाडीमध्ये काही इसम बसून मोबाईल फोनवरून तसेच छोटया पावती पुस्तकावर मटका जुगार घेत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. इको कार (एम एच 14 / एफ एम 9764) मध्ये मटका जुगार खेळणारे व खेळवणा-या इसमांकडून 10 हजार 300 रोख रक्कम, पावती पुस्तक, पेन, दोन मोबाईल फोन तसेच मारुती इको कार असा एकूण 3 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणात गोविंद हनुमंत उपाडे (वय 36, रा. मोशी, ता. हवेली जि. पुणे), अनिल स्वराज गोदाल (वय 31, रा. कुरुळी ता. खेड जि. पुणे) यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कटटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे, कर्मचारी सुरेश हिंगे, संदिप सोनवणे, मच्छिंद्र भांबुरे, देवयानी सोनवणे, नितीन गुंजाळ, प्रेमकुमार पावडे, रेणुका माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.