Chakan Crime News : चाकण पोलिसांची दोन जुगार अड्ड्यांवर कारवाई; 17 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – चाकण पोलिसांनी शनिवारी (दि. 4) नाणेकरवाडी येथे एका व्हिडीओ गेम पार्लरमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर आणि चाकण मधील एका जुगार अड्ड्यावर कारवाई केली. दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 17 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन्ही कारवायांमध्ये एकूण दोन लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पहिल्या कारवाईत अप्पासाहेब मनोहर राऊत (वय 32, रा. मेदनकरवाडी, ता. खेड), राहूल नागनाथ काटे (वय 23, रा. मेदनकरवाडी, ता. खेड. मूळ रा. परभणी), हिरालाल सुरेश पाटील (वय 38, रा. तळेगाव चौक, ता. खेड. मूळ रा. जळगाव), राजीव ज्ञानोबा चव्हाण (वय 31, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. लातूर), संजय सुदन सावंत (वय 45, रा. कडाचीवाडी, ता. खेड. मूळ रा. पश्चिम बंगाल), मिठू जयराम ससाणे (रा. श्रीगोंदा. जी, अहमदनगर), बाळासाहेब हनुमंत भुजबळ (रा. चाकण, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार नितीन गुंजाळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव चौक, चाकण येथे असलेल्या महालक्ष्मी व्हिडीओ गेम पार्लरमध्ये आरोपी मशीन गेमच्या आकड्यांवर पैसे लावून जुगार खेळत होते. आरोपी मिठू ससाणे याचे हे व्हिडीओ गेम पार्लर आहे. तर आरोपी बाळासाहेब भुजबळ याची जागा आहे. याप्रकरणी गेम पार्लर, जागा मालक यांच्यासह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून दोन लाख चार हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई मार्केट यार्डजवळ, चाकण येथे करण्यात आली. त्यामध्ये अजय महादेव टाक (वय 22, रा. चाकण, ता. खेड. मूळ रा. परभणी ), रोशन भीमराव मानवटकर (वय 31, रा. महाळुंगे, ता. खेड. मूळ रा. नागपूर), सुदर्शन सुनील आरकडे (वय 22, रा. बलुतआळी, चाकण, ता. खेड. मूळ रा. बीड), गजानन माधवराव खिल्लारे (वय 45, रा. बिडवस्ती, ता. खेड. मूळ रा. हिंगोली), शुभम अजय कांबळे (वय 24, रा. खंडोबामाळ, चाकण. मूळ रा. मुळशी), प्रकाश वासुदेव पाटील (वय 40, रा. चाकण, ता. खेड. मूळ रा. बुलढाणा), बालाजी ज्ञानोबा मिसाळ (वय 26, रा. कांगडे  वस्ती,चाकण, ता. खेड. मूळ रा. जालना), अजय अंकुश कांबळे (वय 30, रा. बिडवस्ती, चाकण, ता. खेड), हबीब अब्दुल सय्यद (रा. शिरूर), रामभाऊ गोरे (रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एका पत्र्याच्या शेडमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत होते. चाकण पोलिसांनी कारवाई करत 33 हजार 980 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपी हबीब हा जुगार अड्डा चालवत होता. तर आरोपी रामभाऊ याने जुगार अड्ड्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.