Chakan Crime News : वेश्या व्यवसाय चालणाऱ्या लॉजवर चाकण पोलिसांचा छापा; दोन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – वेश्या व्यवसाय चालणाऱ्या एका लॉजवर चाकण पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यात दोन महिलांची सुटका करण्यात आली असून पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई 31 मार्च रोजी दुपारी मेदनकरवाडी येथील राजतारा लॉज येथे करण्यात आली.

सुहास जनार्दन सावंत (वय 31, रा. दिघी), शंकर मधुकर काळे (रा. च-होली), प्रशांत रामकिसन जगताप (वय 30, रा. मेदनकरवाडी), संकेत संजय पाटील (वय 23, रा. मेदनकरवाडी), रुपेश दत्ता सूर्या (वय 22, रा. चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मेदनकरवाडी येथील राजतारा लॉज मध्ये दोन महिलांना ठेऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. त्यात दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. आरोपींकडून 25 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.