Chakan Crime News : नाणेकरवाडी येथे जुगार अड्ड्यावर चाकण पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – नाणेकरवाडी येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर चाकण पोलिसांनी छापा मारला. त्यात पोलिसांनी 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि. 14) दुपारी पावणे दोन वाजता करण्यात आली.

रामेश्वर बोभीषण घोळवे (वय 27, भोसरी), व्यंकट चंद्रकांत भिसे (वय 28, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक मनोज साबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील तळेगाव चौक परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी व्हिडीओ गेमवर पैसे लावून जुगार खेळत आणि खेळवत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता बुधवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. कारवाईमध्ये 72 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.