Chakan Crime News : पाहुण्यांकडे जेवणासाठी गेलेल्या सासऱ्याला दगडाने मारहाण; जावयावर गुन्हा

एमपीसी न्यूज – चुलत मेव्हण्याच्या घरी पत्नी आणि मुलीसोबत जेवणासाठी गेलेल्या सासऱ्याला जावयाने दगडाने मारले. तसेच पत्नी व मुलीला शिवीगाळ केली. याबाबत सासऱ्याच्या फिर्यादीवरून जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 10) सायंकाळी सहा वाजता खेड तालुक्यातील चिंबळी फाटा येथे घडली.

बाबू नथू जाधव (वय 50, रा. राउतवाडी, मावळ) यांनी याबाबत रविवारी (दि. 11) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विश्वास किसन चौरे, राहुल शिगाट (दोघे रा. चिंबळी फाटा, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांच्या मुलीचा आणि आरोपी विश्वास याचा सन 2017 मध्ये विवाह झाला. विवाहानंतर विश्वास फिर्यादी यांच्या मुलीला किरकोळ कारणांवरून मारहाण करत असल्याने त्यांची मुलगी माहेरी फिर्यादी यांच्या घरी राहण्यास आली आहे.

शनिवारी सायंकाळी फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलगी असे तिघेजण आरोपी विश्वास याच्या घराशेजारी राहणा-या फिर्यादी यांच्या चुलत मेव्हण्याकडे जेवणासाठी गेले होते.

त्यावेळी आरोपी विश्वास आणि राहुल तिथे आले. त्यांनी फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलगी यांना शिवीगाळ केली. तसेच विश्वास याने फिर्यादी यांना दगडाने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले आहेत.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.