Chakan : कंपनीचे शटर उचकटून एक लाखांची रक्कम लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीचे शटर उचकटून कंपनीमधील 1 लाख 12 हजार 179 रुपयांची रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी मेदनकरवाडी मधील एंटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमध्ये उघडकीस आली.

अमित कृष्णा गरड (वय 27, रा. कंद पाटील नगर, देहूगाव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गरड मेदनकरवाडी मधील एंटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीमध्ये नोकरी करतात. रविवारी (दि. 11) रात्री आठ वाजताच्या सुरमारास त्यांनी कंपनी बंद केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर उचकटून आत प्रवेश केला. कंपनीमधील 1 लाख 12 हजार 179 रुपयांची रक्कम चोरून नेली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.