Chakan Crime News : खंडणी प्रकरणी माथाडी बोर्डाच्या आठ जणांविरोधात गुन्हा 

एमपीसी न्यूज – प्रत्यक्ष काम न करणाऱ्या दोन माथाडी कामगारांचे प्रत्येकी महिना 20 हजार रुपये माथाडी कामगार मंडाळात जमा  करण्याची  धमकी देऊन खंडणी स्वरूपात 1 लाख 73 हजार 700 रुपये वसूल करणा-या पिंपरी चिंचवड माथाडी कामगार बोर्डाच्या अधिकारी कामगार यांच्यासह आठ जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

हा प्रकार जानेवारी 2019 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत भांबोली (ता. खेड) याठिकाणी घडला.

अजय कोदरे, दत्ताभाऊ दौंडकर, काळुराम शंकर कोदरे, कैलास कौदरे, एकनाथ रोडे, सौरभ पांडे, अतुल बुरसे, भरत दत्तू देवाडे यांच्या सह पिंपरी चिंचवड माथाडी कामगार बोर्डाच्या अधिकारी कामगार यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी लक्ष्मण पांडुरंग कारभारी (वय 38, रा. कोंढवा खुर्द पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना तुमच्या कंपनीत आमचे दोन कामगार नेमा.  ते प्रत्यक्ष कामावर हजर राहणार नाहीत मात्र, त्यांचा प्रत्येकी वीस हजार रुपये पगार माथाडी कामगार मंडाळात जमा करावा. असं केलं तर माथाडी टोळीकडून भविष्यात कोणताही त्रास होणार नाही.  असं केलं नाही तर, तुमची वाट लाविण व तुमच्यापैकी एकाला जीव गमवावा लागेल अशी धमकी दिली.

तसेच, या भागात कंपनी कशी चालवता तेच बघतो, अशी भिती घातली. त्यानंतर आरोपी अजय कोदरे याने खंडणी स्वरूपात 1 लाख 73 हजार 700 रुपये स्वीकारले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.