Chakan Crime News : गांजा विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा; साडेतीन किलो गांजा जप्त

0

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीकडून पोलिसांनी तीन किलो 659 ग्राम वजनाचा गांजा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 5) रात्री खेड तालुक्यातील कोळवे येथे करण्यात आली.

सचिन गणपत आवळे (वय 32, रा. कोळवे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह त्याची महिला साथीदार राणी महेश जगनाडे (वय 40, रा. कोळवे, ता. खेड) हिच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळवे गावात दोघेजण गांजा विक्री करत असल्याची माहिती चाकण पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई केली. त्यात पोलिसांनी आरोपी सचिन याला अटक केली. त्याच्याकडून 92 हजार 975 रुपये किमतीचा तीन किलो 659 ग्राम वजनाचा पाने, फुले, बिया-बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकिरी रंगाचा गांजा जप्त केला.

आरोपी गांजा विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडून गांजा विक्रीसाठी वापरला जाणारा वजन काटा देखील जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1
Leave a comment