Chakan Crime News : जमिनीची हद्द कायम करण्यासाठी गेलेल्या भूमापन अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी

दहा ते बारा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – आंबेठाण ( ता. खेड) येथील मालपाणी यांच्या मालकीच्या जमिनीची हद्द कायम करण्यासाठी गेलेल्या भूमापन अधिका-यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि.26) सकाळी अकराच्या सुमारास गट नं 238 आंबेठाण येथे हि घटना घडली.

बाळासाहेब विठोबा मांडेकर, तानाजी विठोबा मांडेकर, कांचन विठोबा मांडेकर, रतन बाळासाहेब मांडेकर, हिराबाई विठोबा मांडेकर, शिवाजी विठोबा मांडेकर, लक्ष्मण सखाराम भालेराव, शरद ज्ञानेश्वर मांडेकर यांच्या सह इतर चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भूमापन अधिकारी रामेश्वर वामनराव आरु (वय 45) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेठान येथील गट नं 238 हा मालपाणी यांच्या मालकीचा आहे. याठिकाणी आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच, भूमापन अधिका-यांना शिवीगाळ करत याठिकाणी काम केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्यवंशी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.