Chakan Crime News : मद्यपी दुचाकीस्वाराची कारला समोरून धडक; एका चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मद्य प्राशन करून दुचाकी चालवून रस्त्याने जाणाऱ्या एका कारला समोरच्या बाजूने धडक देऊन अपघात केला. यामध्ये दुचाकीवरील मागे बसलेल्या एका लहान मुलाचा मृत्यू झाला. ही घटना 31 जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता झित्राईमळा चाकण येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

रिहान अन्सारी असे मृत्यू झालेल्या लहान मुलाचे नाव आहे. बाबुलाल लक्ष्मण सुरपान (वय 27, रा. आंबेठाण रोड, चाकण) असे मद्यपी दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबुराव मानसिंग राठोड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबुलाल याने मद्य प्राशन करून 31 जानेवारी रोजी दुचाकी चालवली. दुपारी साडेचार वाजता बाबुलाल मयत रिहान याला घेऊन आंबेठाण चौकाकडून आंबेठाण गावाकडे जात होता. त्याने बेदरकारपणे दुचाकी चालवून आंबेठाण गावाकडून आंबेठाण चौकाकडे येणाऱ्या एका कारला बाबुलाल याने जोरात धडक दिली. यामध्ये तो जखमी झाला. तर त्याच्या दुचाकीवर बसलेल्या लहान रिहानचा मृत्यू झाला. बाबुलाल याने वाहन चालविण्याचा परवाना नसताना देखील वाहन चालविल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1