Chakan Crime News : शेतकरी महिलेला घरात घुसून बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका महिलेच्या भाताच्या शेतात एका व्यक्तीची म्हैस घुसली. त्यानंतर झालेल्या वादातून तिघांनी मिळून शेतकरी महिलेला घरात घुसून बेदम मारहाण केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी खेड तालुक्यातील गडद गावात घडली.

हिराबाई रामदास कौदर (वय 55, रा. गडद, ता. खेड) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शांताराम तुकाराम शिंदे, दत्तू तुकाराम शिंदे, बाबू सखाराम शिंदे, (तिघे रा. गडद, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखाराम शिंदे यांची म्हैस फिर्यादी यांच्या भाताच्या शेतात घुसली. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या घरात घुसून त्यांना फरफटत बाहेर आणले. फिर्यादी यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच सरपणातील लाकडी काठ्यांनी कपाळावर, पायावर, हातावर मारून जखमी केले. त्यानंतर शांताराम शिंदे याने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.