Chakan crime News : माथाडी कामगार संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षासह पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज – आमच्या माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीत नेमल्याचे दाखवून त्याच्या पगाराचे 22 हजार रुपये दरमहा हप्ता द्या, अशी खंडणीची मागणी करणा-या एका कामगार संघटनेच्या अध्यक्षासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

वेदांत एंटरप्रायजेस नावाच्या माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष अजय शंकर कौदरे (वय 39, रा. खरोशी, ता. खेड), प्रदीप रामचंदनरा सोनवणे (वय 32, रा. खरोशी, ता. खेड), गणेश दशरथ सोनवणे (वय 33, रा. कुरुळी, ता. खेड), स्वप्नील अजिनाथ पवार (वय 29, रा. एकतानगर, चाकण), धोंडिबा उर्फ हनुमंत विनायक वडजे (वय 32, रा. मेदनकरवाडी, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कुरुळी येथील एका कंपनीच्या अधिका-यांना कंपनी चालवायची असेल तर आरोपींच्या वेदांत एंटरप्रायजेस नावाच्या माथाडी कामगार संघटनेचा एक कामगार कंपनीत नेमल्याचे दाखवून प्रत्यक्ष त्याला कामावर न घेता त्याचा पगार आणि इतर चार्जेस असा एकूण 22 हजार रुपये हप्ता आम्हाला द्या. नाहीतर तुमच्याकडे बघून घेईन. तुमची विकेट काढीन, अशी धमकी दिली.

याबाबत म्हाळुंगे चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करत पोलिसांनी खंडणी स्वीकारण्यासाठी आरोपी कंपनीत येण्याची वेळ गाठून कंपनीत सापळा लावला. आरोपी कंपनीत खंडणीची रक्कम नेण्यासाठी येताच पोलिसांनी त्यांना अटक केली.

पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरात माथाडी, स्क्रॅप व इतर कंपनीतील कामे मिळविण्यासाठी कोणी गैरमार्गाचा तसेच दादागिरीला अवलंब करून औद्योगिक शांतता भंग केल्यास कंपन्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1