Chakan crime News : दूध डेअरी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – दूध डेअरी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणा-या पतीसह सासू – सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चाकण येथील दावडमळा येथे घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय पीडित विवाहित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती निलेश बाळासाहेब गोरे (वय 29), निर्मला बाळासाहेब गोरे (वय 48) व बाळासाहेब धोंडीबा गोरे (वय 58) ( सर्व रा. दावडमळा, चाकण ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मे 2015 मध्ये निलेश गोरे याच्याशी विवाह झाला होता. मात्र, लग्नाच्या सहाव्या महिन्यापासूनच निलेश पत्नीला माहेरून दूध डेअरी टाकण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत होता.

त्यासाठी पत्नीला लोखंडी गज, बेल्ट सारख्या वस्तूनी मारहाण करायचा तसेच वारंवार दमदाटी करून शिवीगाळ करायचा. सासरच्या जाचाला कंटाळून पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.

चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.