Chakan Crime News : सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी न दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात दिलेले सोन्याचे दागिने विवाहितेने सासरच्या लोकांना गहाण ठेवण्यासाठी दिले नाहीत, या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याची फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान बबन पानसरे (रा. बहुळ, ता. खेड) असे गुन्हा दाखल झेलल्या पतीचे नाव आहे. याबाबत पीडित विवाहितेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 3 जानेवारी 2021 ते 22 जानेवारी 2021 या कालावधीत रायगड मधील अलिबाग आणि खेड तालुक्यातील बहुळ येथे घडला. विवाहितेला लग्नात घातलेला सोन्याचा हार आणि स्त्रीधन म्हणून घातलेले मंगळसूत्र गहाण ठेवण्यासाठी पती समाधान यांनी मागितले. त्यासाठी विवाहितेने नकार दिला.

त्यावरुन आणि विवाहितेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याच्या कारणावरुन समाधान याने वारंवार शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन क्रूर वागणूक दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.