Chakan Crime News : ‘पोलिसात तक्रार केली तर मी तुला सोडणार नाही’

शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-या महिलेचा विनयभंग करीत धमकी

एमपीसी न्यूज – पतीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारणा-या महिलेशी एकाने असभ्य वर्तन करत महिलेचा विनयभंग केला. ‘पोलिसात तक्रार केली तर मी तुला सोडणार नाही’ अशी धमकी देखील आरोपीने दिली. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री अहिरेगाव येथे घडली.

सचिन सुभाष आहेरकर (रा. आहेरगाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 30 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 25) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन हा फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ करत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी ‘तू माझ्या पतीला शिवीगाळ का करतोस’ असा जाब विचारला. त्यावरून सचिन याने फिर्यादी यांना जोरात धक्का मारून त्यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. ‘पोलिसात तक्रार केली तर मी तुला सोडणार नाही’ अशी धमकी देखील आरोपीने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.