Chakan Crime News : कारमधून बेकायदेशीरपणे गुटखा व दारूची वाहतूक; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कारमधून बेकायदेशीरपणे गुटखा आणि दारूची वाहतूक केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा पथकाने सोमवारी (दि. 5) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास तळेगाव-चाकण रोडवर म्हाळुंगे येथे ही कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

निलेश मुलचंद असाटी (वय 28), नितीन महादेव खरात (वय 33, दोघे रा. म्हाळुंगे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह कैलास बोरले पवार, कल्लू गुप्ता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस नाईक अनिल महाजन यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव चाकण रोडवर सद्गुरुनगर म्हाळुंगे येथे एका कारमधून बेकायदेशीरपणे गुटखा आणि दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून एक कार (एमएच 12 / ईटी 2690) अडवली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये तंबाखूजन्य गुटका, रोख रक्कम आणि विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी एक लाख 71 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.