Chakan : कार्यक्रमामुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करण्यास सांगणा-यावर प्रमुख पाहुण्यांनी केला खुनी हल्ला

एमपीसी न्यूज – ज्वेलर्स दुकानाच्या कार्यक्रमामुळे झालेल्या गर्दीने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे एकाने रस्त्यावरील गाड्या काढून घेण्यास सांगितले. यावरुन कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनीच गाड्या काढून घेण्यास सांगणा-यावर खुनी हल्ला केला, अशी फिर्याद चाकण पोलीस ठाण्यात मंदार देशमुख यांनी दिली. ही घटना रविवारी (दि. 29) दुपारी साडेतीनच्या सुमारास चाकण येथे घडली.

मंदार रमेश देशमुख (वय 33, रा. चाकण) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार, सचिन परदेशी, मंदार परदेशी, किशोर जगनाडे, रोशन परदेशी (सर्व रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे एका ज्वेलर्स या दुकानाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामुळे चाकण-पुणे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे फिर्यादी देशमुख यांनी संबंधितांना वाहने काढून घेण्यास सांगितले. या कारणावरून आरोपींनी देशमुख यांचा रस्ता अडवून त्यांच्या मोटारसायकलला लोखंडी रॉडने मारले. यावेळी देशमुख रस्त्यावर पडले. आरोपी सचिन परदेशी याने ‘तुला माहिती नाही का, मी आणि मंदार परदेशी या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून होतो’ असे म्हणत आरोपींनी देशमुख यांना लोखंडी रॉड आणि लाकडी बांबूने मारहाण केली.

ही भांडणे सोडवण्यासाठी देशमुख यांचा भाऊ आला असता त्याला देखील बेदम मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशी फिर्याद देशमुख यांनी दिली आहे. आरोपींनी परिसरामध्ये दहशत निर्माण केली आहे. घटनेनंतर आरोपी त्यांच्या मोटारीतून पळून गेले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like