Chakan Crime News : दुकानाचे शटर उचकटून लॅपटॉप आणि स्वाईप मशीन चोरीला

एमपीसी न्यूज – दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानातून एक लॅपटॉप आणि तीन स्वाईप मशीन चोरून नेल्या. ही घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी डोंगरेवस्ती, निघोजे येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

सुनील पोपट इचके (वय 34, रा. डोंगरेवस्ती, निघोजे) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी इचके यांचे निघोजे येथील डोंगरेवस्तीमध्ये श्री स्वामी समर्थ इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. गुरुवारी रात्री अकरा ते शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी इचके यांच्या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातून एक लॅपटॉप आणि तीन स्वाईप मशीन असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.