Chakan Crime News : कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून 90 हजारांचे साहित्य पळवले

0

एमपीसी न्यूज – कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी कंपनीमधून 90 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी रात्री दीड ते तीन वाजताच्या कालावधीत खराबवाडी येथील ओटर कंट्रोल इंडिया प्रा. लि. या कंपनीत घडली.

अक्षय जगदीश देव्हारे (वय 31, रा. सारा सिटी, खराबवाडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 14) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथील ओटर कंट्रोल इंडिया प्रा. लि. या कंपनीत फिर्यादी एच आर मॅनेजर पदावर काम करतात. 13 ऑक्टोबर रोजी त्यांच्या कंपनीच्या शेडचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतून 90 हजार रुपये किमतीचे ब्रास स्ट्रीपचे सहा बंडल चोरून नेले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.