Chakan crime News : तक्रार केल्याच्या कारणावरून मारहाण करत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिलेकडे वाईट नजरेने बघत असल्याची तक्रार महिलेने आणि तिच्या पतीने आरोपीच्या घरच्यांकडे केली. यावरून आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी महिलेला मारहाण केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

ही घटना रविवारी (दि. 31) दुपारी चार वाजता खेड तालुक्यातील कुरकुंडी येथे घडली.

ज्ञानेश्वर सोपान ढोरे, सुनील सोपान ढोरे, रुपाली ज्ञानेश्वर ढोरे, वर्षा सुनील ढोरे (सर्व रा. कुरकुंडी, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील मागील पाच दिवसांपासून पीडित महिलेकडे वाईट नजरेने बघत होता. त्याबाबत महिलेने आणि तिच्या पतीने सुनीलच्या घरच्यांकडे तक्रार केली. यावरून आरोपींनी पीडित महिलेला शिवीगाळ आणि दमदाटी केली. बळजबरीने घरात घुसून महिलेला मारहाण करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.