Chakan crime News : रात्रपाळीवर कामाला निघालेल्या महिलेचा विनयभंग; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रात्रपाळीवर कामाला निघालेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 17) सायंकाळी सातच्या सुमारास युनिकेअर हॉस्पिटल, चाकण येथे घडला.

सदाशिव रामचंद्र गायकवाड (रा. कोयाळी, ता. खेड), राजू भोकर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्रपाळीवर कामाला निघाली होती. चाकण-शिक्रापूर रोडवर बसची वाट पाहत असताना आरोपी सदाशिव याने अश्लील बोलून तिचा विनयभंग केला.

तसेच तिचा पाठलाग केला. महिला काही अंतर पुढे जाऊन थांबली असता आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन करून तिचा पुन्हा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.