Chakan Crime News : स्वस्तात फ्लॅट देण्याचे अमिष दाखवून एकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – स्वस्त दरात फ्लॅट देण्याचे अमिश दाखवून एकाची 40 लाख 69 हजारांची फसवणूक केली. याबाबत एका बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

विमल गोवर्धन पिपालिया (रा. सेक्टर 8, खारघर, नवी मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अंकुश निवृत्ती डोंगरे (वय 49, रा. चाकण शिक्रापूर रोड, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिपलीया याने फिर्यादी डोंगरे यांना इतरांपेक्षा कमी दरात फ्लॅट देतो, असे अमिष दाखवले. त्यापोटी आरोपीने डोंगरे यांच्याकडून 40 लाख 69 हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार 15 फेब्रुवारी 2016 पासून 24 जून 2020 या कालावधीत आंबेठाण रोड, चाकण येथील ऊर्जा डेव्हलपर्स कार्यालयात घडला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.