Chakan Crime News : सिक्युरिटी इनचार्जला मारहाण करत कंपनीत दहशत; 8 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – ‘आम्ही दारू पित असल्याची माहिती आमच्या मालकाला कोणी दिली’ असे म्हणत आठ जणांनी मिळून कंपनीच्या सिक्युरिटी इनचार्जला बेदम मारहाण केली. तसेच कंपनीत भीतीचे वातावरण निर्माण केले. याबाबत आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सोमवारी (दि. 22) रात्री खराबवाडी येथील डीटीएल कंपनी युनिट एक येथे घडला.

विशाल ज्ञानेश्वर वावळ (वय 39, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय म्हस्के आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वावळ हे खराबवाडी येथील डीटीएल कंपनीत सिक्युरिटी इनचार्ज म्हणून काम करतात. सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता आरोपी जमाव करून फिर्यादी यांच्याकडे आले.

‘आम्ही दारू पित असल्याची माहिती आमच्या मालकाला कोणी दिली’ असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर आरोपी लाकडी बांबू घेऊन फिर्यादी यांच्या कंपनीच्या गेटवरून उडी मारून आत आले. फिर्यादी आणि त्यांच्या सिक्युरिटी गार्डला हाताने, लाथाबुक्क्यांनी व लाकडी बांबूने मारहाण करून कंपनीत भीतीचे वातावरण निर्माण केले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.