Chakan Crime News : फ्लॅट वाटणीच्या कारणावरुन आई-वडिलांना मारहाण; मुलगा आणि सुनेवर गुन्हा

एमपीसी न्यूज – फ्लॅट वाटप आणि घरगुती कारणांवरून मुलगा आणि सुनेने मिळून आई-वडिलांना मारहाण केली. ही घटना बलुतं आळी, चाकण येथे सहा डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी मुलगा आणि सून यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरण शेखर तोडकर, अमृता किरण तोडकर (दोघे रा. खालूंब्रे, ता.खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सुमन शेखर तोडकर (वय 55, रा. श्रीपूर्णा कॉम्प्लेक्स, बलुतं आळी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादी सुमन आणि त्यांचे पती शेखर तोडकर यांना घरगुती आणि फ्लॅट वाटणीच्या कारणावरुन शिवीगाळ करून दमदाटी केली. सून अमृता हिने फिर्यादी यांना केस धरून पायावर लाथ मारून गुडघा फ्रॅक्चर केला. याबाबत मुलगा आणि सुनेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.