Chakan Crime News : पीएमपीएमएल बसची तोडफोड करत चालक व वाहकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसची तोडफोड करून बस चालक आणि वाहक तसेच बसमधील (Chakan Crime News) इतर पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांला मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 28) रात्री नाशिक रोड, वाकी फाटा येथे घडला.

 

अमित सत्यवान हाडवळे (वय 36, रा. जुन्नर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14 / केएम 1116 क्रमांकाच्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Nigdi News : पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीएमपीएमएल मध्ये वाहक पदावर काम करतात. ते त्यांची बस घेऊन जात असताना वाकी फाटा येथे बस थांब्यावर त्यांनी बस थांबवली. त्यावेळी आरोपी त्याच्या कारमधून आला. त्याने फिर्यादी आणि त्यांचा बस चालक कदम यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. तसेच बसमधील अन्य पीएमपी कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ करून मारहाण करण्याची धमकी दिली. पीएमपी बसची तोडफोड केली. ई तिकीट मशीन, मोबाईल फोनचे नुकसान केले. बस हलवली तर तुमच्याकडे पाहतो, असे म्हणून फिर्यादीला सरकारी काम करण्यास अडथळा निर्माण केला असल्याचे (Chakan Crime News) फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.