-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chakan Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; ॲट्रॉसिटी दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेला वारंवार हॉटेलवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना मार्च 2020 ते 19 मे 2021 या कालावधीत घडली. याबाबत बलात्कार आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित अशोक गोरे (रा. चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित याने पीडित महिलेचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाचे आमिष दाखवून तिला वेळोवेळी डोणजे येथील मधुबन रिसॉर्ट हॉटेल येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

याबाबत पीडित महिलेने पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर हा गुन्हा चाकण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn