Chakan Crime News : भरधाव कारची दुचाकीला धडक ; एकाचा मृत्यू, एकजण जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणा-या कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एका तरुणाला गंभीर इजा झाली. हा अपघात रविवारी (दि.13) मध्यरात्री साडेबारा वाजता खेड तालुक्यातील बहुळ गावात झाला.

भरत अशोक लटपटे (वय 27, रा. पडाळवाडी, राजगुरूनगर, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर ब्रह्मदेव नाथाराव गुट्टे (वय 21, रा. वाघदरवाडी, ता. अंबेजोगाई, जि. बीड) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

कार चालक काकासाहेब जगन्नाथ काटकर (वय 22, रा. पाल जाधववाडी, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार संतोष सुपेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याची ईर्टिगा कार (एमएच 20 / डीजे 3748) घेऊन चाकण-शिक्रापूर रोडने जात होता. त्यावेळी शिक्रापूर-चाकण रस्त्यावरून येत असलेल्या एका दुचाकीला (एमएच 14 / सीवाय 9035) कारने जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील भरत लटपटे याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील दुसरा तरुण ब्रह्मदेव गुट्टे हा गंभीर जखमी झाला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.