Chakan Crime News : RTPCR चाचणीचे बनावट रिपोर्ट देणारे दोघे जेरबंद

0

एमपीसी न्यूज – कोरोनासाठी केल्या जाणा-या RTPCR चाचणीचे बनावट रिपोर्ट देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. 9 ते 16 एप्रिल दरम्यान म्हाळुंगे, भांबोली (ता. खेड) याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला.

बिरुदेव नानासाहेब वाघमोडे (वय 22, रा. जाधववाडी, चिखली) व बळीराम बापू लोंढे (वय 24, रा. शरदनगर, चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी सुजित विजय वायकर (वय 38, रा. चऱ्होली , ता. हवेली ) यांनी शुक्रवारी (दि.30) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे चिखलीतील समर्थ लॅबचे कामगार आहेत. फिर्यादी हे इम्प्रेशन्स सर्विसेस या कंपनीत कामाला असून त्यांच्या कंपनीतील 62 कामगारांचे कोरोना नमूने तपासणीसाठी आरोपींकडे दिले. आरोपींनी ते नमूने कृष्णा डायगनोस्टिक लॅबकडे न देता जुन्या रिपोर्टमध्ये छेडछाड करुन त्यावर डिजिटल सही व शिक्के मारले.

अशाप्रकारे RTPCR चाचणीचे बनावट रिपोर्ट देऊन त्यांनी कामगारांची फसवणूक केली. दोन्ही आरोपी अटक असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment