Chakan Crime News : ‘माझी मुले माझ्या ताब्यात दे’ म्हणत पत्नीवर चाकूने वार; पतीला अटक

एमपीसी न्यूज – ‘माझी मुले माझ्या ताब्यात दे’ असे म्हणून दारु पिऊन पत्नीवर चाकूने वार करणा-या पतीला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. 29) वाघे वस्ती, चाकण (ता. खेड) येथे हा प्रकार उघडकीस आला.

मंगेश रामदास कदम (वय 36, रा. वाघे वस्ती, चाकण, ता. खेड ) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी दारु पिऊन पत्नीला ‘माझी मुले माझ्या ताब्यात दे’ असे म्हणाला. तसेच, शिवीगाळ करून चाकूने पत्नीच्या हातावर वार केला. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार बुरुड करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.