Chakan Crime News : जीवे मारण्याची धमकी देत तरुणीवर दहा दिवस बलात्कार

एमपीसी न्यूज – चाकण येथे भाड्याने खोली घेऊन तिथे तरुणीला आणून तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर दहा दिवस बलात्कार केला. हा प्रकार 6 फेब्रुवारी पूर्वी घडला आहे.

याबाबत 20 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भीमा नारायण अंभारे (रा. सुंदरनगर, चंदनझिरा, ता. जि. जालना) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने चाकण परिसरात भाड्याने एक खोली घेतली. तिथे पीडित तरुणीला आणले. तिला चाकूचा धाक दाखवून तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देत दहा दिवस वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

‘मला तुझ्यासोबत राहायचे नाही. माझ्या सोबत जबरदस्ती करू नको. मला आई-वडिलांकडे नेऊन सोड’ अशी तरुणीने वारंवार विनंती केल्यावर जीवे मारण्याची धमकी देत तिला तिच्या आई-वडिलांकडे नेऊन सोडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.