Chakan Crime News : डंपरने दुचाकीला धडक दिल्याचा जाब विचारल्यावरून दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – एका डंपरने दुचाकीला धडक दिली. त्याचा जाब डंपर चालकाला दुचाकीच्या मालकाने विचारला. यावरून डंपर चालक आणि मालक आणि अन्य दोघांनी मिळून जाब विचारणा-या व्यक्तीच्या दोन्ही मुलांना बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 7) रात्री दहा वाजता वसोली ई एस आर कंपनी समोर घडली.

शांताराम मारुती पानमंद (वय 61, रा. शिंदे गाव, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रणजीत कांताराम पानमंद, मारुती सुभाष वडजे (दोघे रा. शिंदे गाव, ता. खेड) आणि अन्य दोनजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पानमंद त्यांच्या दुकानासमोर दुचाकी उभी करून दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी रणजीत चालवत असलेल्या डंपरने फिर्यादी यांच्या दुचाकीला धडक दिली.

याचा पानमंद यांनी डंपर चालकाला जाब विचारला. यावरून डंपर चालक मारुती, मालक रणजीत आणि अन्य दोघांनी फिर्यादी यांच्यासोबत भांडण केले.

हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांची दोन मुले आली. आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. एका मुलाच्या हात, पाय, पाठीवर मारहाण केली.

तर दुस-या मुलाच्या डोक्यावर, नाकावर मारून नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. आरोपींनी फिर्यादी यांना पुन्हा मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करत दुचाकीची हेडलाईट फोडून नुकसान केले.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.