Chakan Crime News : उघड्या दरवाजातून घरात घुसून अडीच लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजा वाटे घरात घुसून चोरट्यांनी घरातील कपाटातून सोन्याचा नेकलेस, गंठन, इयररिंग तसेच 40 हजार रूपये रोख रक्कम चोरून नेली. 17 ते 18 डिसेंबर दरम्यान खेड तालुक्यातील बहुळ याठिकाणी ही घटना घडली.

याप्रकरणी शकिल कादरभाई मुलाणी (वय 27, रा बहुळ, ता खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 ते 18 डिसेंबर दरम्यान फिर्यादी यांचे घर बंद होते. मात्र, चुकून दरवाजा उघडा राहिल्याने अज्ञात चोरटे घरात शिरले. घरातील कपाटातून 40 हजार रूपये रोख रक्कम तसेच, सोन्याचा नेकलेस, गंठन, इयररिंग असा अडिच लाखांचा ऐवज चोरून नेला आहे.

सहाय्यक पोलीस फौजदार जाधव अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.