Chakan crime News : कंपनीतून सव्वा तीन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण जवळ कुरुळी येथील कॅसकेड इंडिया मटेरियल हॅंडलिंग प्रा. ली. या कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 27 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यान घडला.

विनीत विकास कोकीळ (वय 38, रा. कोथरूड, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोकीळ हे कुरुळी येथील कॅसकेड इंडिया मटेरियल हॅंडलिंग प्रा. ली. या कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी करतात.

त्यांच्या कंपनीतून 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा ते 5 ऑक्टोबर रोजी सकाळी पाच या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी 72 हजारांचे तीन कॉपर रॉड बंडल, 51 हजारांचे दोन कॉपर रॉड बंडल आणि अन्य साहित्य असा एकूण तीन लाख 27 हजार रुपयांचा माल चोरून नेला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.