Chakan Crime News : गुटखाजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या तिघांना अटक, अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – गुटखाजन्य पदार्थांची वाहतूक करणा-या तीन जणांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली. त्यांच्याजवळून 5 लाख 82 हजार 80 रूपयांचा गुटखाजन्य पदार्थ व एक टेम्पो, असा एकूण 10 लाख 82 हजार 080 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवार (दि.15) चाकण शिक्रापूर रोडवर दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

अशोक बबन काकडे (वय 55, रा. आळेफाटा, जुन्नर), राहुल संजय डोंगरे (वय 28) व हर्षद सुरेश गंगावणे (वय 21, रा. बहुळ, खेड), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एमएच 14 एच जी 4905 या टेम्पोमधून प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याजवळून 5 लाख 82 हजार 80 रूपयांचा गुटखाजन्य पदार्थ व एक टेम्पो, असा एकूण 10 लाख 82 हजार 80 रूपयांचा मुद्देमाल जपात करण्यात आला आहे.

आरोपी अटकेत असून पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक जगदाळे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.